Chhabil Patel Discusses DP Road Work Delay with PMC Officials in Pune
पुणे | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पुणे शहर उपाध्यक्ष छबील पटेल यांनी शिवनेरी ते ज्योती चौक या डीपी रस्त्याच्या कामाबाबत पुणे महानगरपालिका पतविभागाचे मुख्य अभियंता सुधीर चव्हाण यांच्याशी विशेष चर्चा केली.
या बैठकीत छबील पटेल यांनी रस्त्याचे काम थांबण्यामागील कारणांची चौकशी केली तसेच नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयींचा मुद्दा अधिकार्यांसमोर मांडला. त्यांनी डीपी रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली.
यावेळी पुणे मनपा अधिकाऱ्यांनी लवकरच डीपी रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्थाही सुकर होणार आहे.