Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

डोंबिवली एमआयडीसीत भीषण आग; गारमेंट कंपनी जळून खाक

Dombivali-midc-garment-company-fire-incident-july-2025

डोंबिवली | २३ जुलै २०२५ – डोंबिवली एमआयडीसी फेज वन परिसरातील ऐरोसेल गारमेंट कंपनीमध्ये आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिसरातील गर्दी हटवून मदतकार्याला अडथळा होऊ नये याची दक्षता घेतली आहे.

सध्या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अधिकृत माहिती आणि तपशील अद्याप प्रतीक्षेत असून, अग्निशमन दलाचे आणि पोलिसांचे बचावकार्य सुरूच आहे.

 

Exit mobile version