सोसायटीत घडला धक्कादायक प्रकार; पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात युवती जखमी
गाजियाबाद येथील एका सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्यांच्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यांनी एका युवतीवर अचानक झडप घातल्याने ती खाली पडून जखमी झाली. जखमी युवतीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, याआधी देखील अशा प्रकारचे प्रकार घडले आहेत, मात्र कुत्र्यांच्या मालकाने कोणतीही काळजी घेतली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित कुत्र्यांच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत