पुण्यात वाहतूक पोलीस-कॅब चालकामध्ये तीव्र वाद; शिवीगाळीनंतर मारहाण
पुणे रेल्वे स्टेशनसमोर घडलेल्या घटनेने शहरात चर्चेला उधाण आले आहे. किरकोळ अपघातानंतर कॅब चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली होती. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला “तू ट्रॅफिक अडवत आहेस आणि लोकांना त्रास देत आहेस” असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. शाब्दिक चकमकीत कॅब चालकाने शिवीगाळ केल्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याने त्याला मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. या भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.