बोरिवलीत भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान मारहाण, मंडईत गोंधळाचे वातावरण
30 जुलै रोजी बोरिवली पश्चिम येथील गजबजलेल्या भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. जागा आणि स्टॉलच्या मालकीवरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हातघाईवर गेला आणि संपूर्ण बाजारपेठेचे वातावरण ढवळून निघाले.
हाणामारीमुळे मंडईतील नियमित व्यवहार पूर्णतः विस्कळीत झाले. ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी हे संपूर्ण प्रकरण डोळ्यांसमोर पाहत भीतीने परिसर सोडला. काहींनी मोबाइलवर हाणामारीचे व्हिडिओ देखील चित्रीत केले आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सध्या परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत