Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

“तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनी दिले” – भाजपा आमदाराचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य!

भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत

वादग्रस्त विधान केले आहे. एका गावातील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हे विधान केले. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत”, असं वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केलं आहे. आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

 

Exit mobile version