Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

कार्यक्रमानंतर लिफ्टमध्ये अडकले आमदार दरेकर, वसईत गोंधळाचं वातावरण

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर एका कार्यक्रमासाठी वसईत आले होते. कार्यक्रम आटोपून खाली उतरत असताना लिफ्ट अचानक बंद पडली आणि त्यामध्ये प्रवीण दरेकर अडकले.

सुमारे १५ ते २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर यंत्रणांनी तत्काळ लक्ष देत त्यांची सुखरूप सुटका केली. या दरम्यान काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सुदैवाने कोणतीही शारीरिक इजा झाली नाही आणि आता आमदार दरेकर पूर्णपणे सुरक्षित आहेत. उपस्थितांनी घटनेनंतर दिलासा व्यक्त केला असून लिफ्टच्या देखभालीबाबत प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version