Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

डंपरच्या धडकेनं कुटुंब उध्वस्त झालं, बाप लेकींचा जागेवर मृत्यू, वडील धक्क्याने गेले

Baramati Tragedy: Father and Daughters Die in Crash, Grieving Grandfather Passes Away Next Day

बारामती (पुणे): बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून जाणाऱ्या ओंकार आचार्य (वय अंदाजे ३५), त्यांची चार वर्षांची कन्या मधुरा आणि दहा वर्षांची मुलगी सई यांना डंपरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या अपघाताचा जबर मानसिक धक्का बसल्यामुळे ओंकार यांचे वडील, राजेंद्र आचार्य (वय अंदाजे ६५) यांचेही सोमवारी पहाटे निधन झाले. आधीपासूनच आजारी असलेल्या राजेंद्र आचार्य यांना मुलगा व दोन नातवंडांच्या अपघाती निधनाचा धक्का सहन झाला नाही आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.

एकाच कुटुंबातील चार जणांचा असा दु:खद अंत झाल्याने बारामती शहरात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version