भांडयाचे दुकान फोडणारे आरोपी जेरबंद रोख रक्कम व रिक्षासह एकूण ५९०१०/- रुपये किं. चा मुद्देमाल जप्त

Pune News:दि. ३१/०७/२०२५ रोजी रात्रौ ०२/०० वा.चे सुमा. श्री कृष्णा मेटल्स नावाचे भांडयाचे दुकान, प्रियंकानगरी, वाघोली पुणे याचे अनोळखी तीन इसमांनी शटर उचकाटून तोडून रोख रक्कम चोरी करून रिक्षा मधून पळून गेले बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेवरून गु. र.नं. ३८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१ (४), ३२४ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास चालू असताना महिला पोउपनि सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार समीर भोरडे, प्रविण केदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीआधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपी नागे १) अनिकेत अविनाश इंगळे वय २१ वर्षे, रा. बिरादारनगर, नर्मदाबाई कांबळे शाळेजवळ, वैदुवाडी, हडपसर, पुणे २) साहिल रोशन शेख वय २० वर्षे, रा. बिरादारनगर, नर्मदाबाई कांबळे शाळेजवळ, वैदुवाडी, हडपसर, पुणे व विधीसंघर्षीबालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी हडपसर भागातून रिक्षा चोरी करून वरिल गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपी १ ते २ यांना अटक करून त्यांचेकडून रोख रक्कम व रिक्षा असा एकूण ५९०१०/- रुपये कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री. युवराज हांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), आसाराम शेटे वाघोली पोलीस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, म. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, प्रविण केदार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *