पुण्यात गंगाधाम फेज १ परिसरात दुचाकीला लागली आग; अग्निशमन दलाची तत्काळ मदत
पुणे, ४ सप्टेंबर २०२५ – गंगाधाम फेज १ परिसरात गुरुवारी रात्री एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती नागरिकांनी थेट गंगाधाम अग्निशमन केंद्रात धाव घेऊन दिली.
सुमारे रात्री ८:३२ वाजता ही आग लागल्याचे कळताच नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी अॅक्टिवा स्कूटरला पेटलेले पाहिले. अग्निशमन दलाच्या जवानांनी होज रीलच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन पथकात अधिकारी राहुल नलावडे, चालक निलेश कदम, जवान जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, साईनाथ पवार तसेच सहाय्यक गणेश माते, अनिकेत खेड़ेकर, संकेत जाधव आणि साईनाथ पवार यांचा समावेश होता.