महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर!
श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्ती वेतन उद्या, म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यामुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.