अल्पवयीनांना दारू पुरवठ्याचा गंभीर प्रकार; पुण्यातील पबवर कारवाई

पुणे : शनिवार रात्री पुणे रेल्वे स्थानकाजवळील द मिल्स परिसरातील किकी पबमध्ये सुरू असलेली फ्रेशर्स पार्टी राज्य उत्पादन शुल्क विभागाने थांबवली. या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू पुरवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एमएनएस विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही छापेमारी करण्यात आली. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू झालेल्या या पार्टीत शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. १७ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना कोणतेही ओळखपत्र तपासणी किंवा नोंद न करता प्रवेश दिल्याचा आरोप आहे.

उत्पादन शुल्क अधिकारी जगदाळे आणि अधिकारी वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकत पार्टी थांबवली. रात्री दोन वाजेपर्यंत पब व्यवस्थापन आणि आयोजकांविरोधात कारवाई सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *