भिवंडीतील वाडपे गावात डॉक्टरांचा मोबाईल दुपारच्या वेळी लंपास
भिवंडी तालुक्यातील वाडपे गावातील एका क्लिनिकमध्ये दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डॉक्टरांचा मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी डॉक्टर थोडा वेळ विश्रांती घेत होते. ही संपूर्ण घटना क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.