मनसे नेता संतापला, गेम झोन कर्मचाऱ्याला चापट

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते उल्हास भोईर यांनी ठाण्यातील एका गेम झोनमध्ये कर्मचाऱ्याला चपराक दिली. यामागचं कारण म्हणजे, शालेय गणवेशात आलेल्या विद्यार्थ्यांना गेम झोनमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

“हे विद्यार्थी शाळा बुडवून घरी दिलेले पैसे घेऊन येथे येतात… हे बरोबर आहे का?” असा सवाल करत उल्हास भोईर यांनी गेम झोन व्यवस्थापनाला फैलावर घेतलं.

हा प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी भोईर यांची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलंय, तर काहींनी विद्यार्थ्यांचे नैतिक मार्गदर्शन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *