Heavy Rain in Pune: Dam Water Release Increases, Fire Brigade Warns Citizens to Stay Away from Riverbeds

पुणे – शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. परिणामी, धरणातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने नदीकाठील भागांमध्ये मेगाफोनद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे.

अग्निशमन दलाकडून सतत घोषणा करून नागरिकांना नदीपात्र, पूल, ओढे, आणि धोकादायक ठिकाणी जाऊ नये, अशी विनंती केली जात आहे. पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढू शकते, त्यामुळे जिवीतहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने सर्वसामान्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, प्रशासन पूरपरिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संभाव्य धोक्याच्या ठिकाणी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांकडे लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *