Kondhwa Sunday Market Shut | Livelihood Crisis for Poor Vendors | Why Is PMC Silent?
*🛑 कोंढव्यातील गोरगरिबांचा आधार ‘संडे बाजार’ बंद!*
*”पुणे मनपा आणि राजकारण्यांना जाब विचारायला हवा का?”*
कोंढवा परिसरातील हजारो गोरगरिबांचं पोट भरवणारा ‘संडे बाजार’ मागील 3 ते 4 आठवड्यांपासून बंद आहे!
शेकडो विक्रेते बेरोजगार झालेत, घर चालवायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
*🧺 एका दिवसाच्या विक्रीवर त्यांचं संपूर्ण आठवड्याचं घरखर्च अवलंबून असतो!*
मात्र ना राजकीय नेत्यांकडून आवाज उठतोय, ना पुणे महानगरपालिकेने ठोस निर्णय घेतला आहे.
*👉 सतर्क महाराष्ट्र न्यूज* च्या वतीने आम्ही ठाम भूमिका घेतो —
या विक्रेत्यांचा ‘संडे बाजार’ परत सुरू झाला पाहिजे, नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना उत्तर द्यावं लागेल!
📢 आमची मागणी:
1️⃣ संडे बाजार सुरू करण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा
2️⃣ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी
3️⃣ गोरगरिबांच्या रोजगारावर गदा येणार नाही याची हमी द्यावी
❗सतर्क महाराष्ट्र न्यूज तुम्हाला आश्वस्त करतं —
“जनतेच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील!”
📲 या मुद्द्यावर तुमचं मत काय आहे? खाली कमेंट करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा!
#Sundebazaar #Kondhwa #PuneNews #SatarakMaharashtraNews #जनतेचाहक्क