“Mumbai Tragedy: 4-Year-Old Girl Falls from 12th Floor While Mother Watches Helplessly

मुंबईतील वसई येथे एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. अवघ्या 4 वर्षांची अनविका प्रजापती ही 12व्या मजल्यावरून अपघाताने खाली पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की बुधवारी सायंकाळी सुमारे 8 वाजता अनविका आणि तिची आई घराबाहेर जाण्यासाठी सज्ज होते. अनविका आधी घराबाहेर येते आणि तिची आई तिच्यामागे बाहेर येते. अनविका मोठ्यांचे चप्पल घालण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यात तिची आई दार लॉक करत असते.

आई तिला पाहते आणि तिला उचलून शू रॅकवर म्हणजेच बूट ठेवण्याच्या कपाटावर बसवते. आई स्वतःच्या चप्पल घालते आणि मुलीच्या सँडल्स हातात घेते. दरम्यान, अनविका शू रॅकवर उभी राहते, आणि तेथून खिडकीच्या ग्रीलजवळ जाते. ती खिडकीच्या चौकटीवर बसण्याचा प्रयत्न करते, पण तोल जाऊन ती थेट खाली पडते.

घडलेलं पाहून अनविकाची आई धक्का बसून जोरजोराने ओरडते. शेजारी मदतीला धावतात आणि मुलीला तात्काळ उचलून वसई पश्चिम येथील सर डीएम पेटिट रुग्णालयात नेण्यात येतं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर इशारा देणारी घटना ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *