Hotel Bhagyashree Owner Kidnapped in Broad Daylight in Dharashiv – Beaten and Thrown Off Bridge

धाराशिव (23 जुलै): धाराशिव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं काही अज्ञात इसमांनी उघडपणे अपहरण करून बेदम मारहाण केली आणि पुलाजवळ फेकून दिलं.

घटना नेमकी कशी घडली?

बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागेश मडके आपल्या हॉटेलसमोर उभे असताना एक चारचाकी गाडी तिथे थांबली. गाडीतून उतरलेल्या चार-पाच तरुणांनी सेल्फी काढण्याचा बहाणा करत मडके यांच्याशी संपर्क साधला. पण काही क्षणातच त्यांनी जबरदस्तीने त्यांना गाडीत ओढलं आणि अपहरण केलं.

गाडीच्या आतच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाही, तर जीव घेण्याचा कट रचल्याचं आरोप खुद्द मडके यांनी केला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांना वडगाव (सि.) येथील एका पुलाजवळ फेकून दिलं.

कसाबसा संपर्क साधला

अपहरणानंतर कसाबसा संपर्क साधत मडके यांनी आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.

तक्रार अजून दाखल नाही

घटनेनंतर अद्याप कोणत्याही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र मडके यांनी स्पष्ट केलं आहे की ते लवकरच आरोपीविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

पोलिस तपास सुरू

शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सेल्फीच्या नावाखाली अपहरण ही गुन्हेगारांची नवी पद्धत असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहन क्रमांकांच्या आधारे तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *