BMW Car Accident at Kanakavali Halval Phata on Mumbai-Goa Highway – 3 Injured

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. कणकवली तालुक्यातील हळवल फाटा येथे आज दुपारी एका BMW लक्झरी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ही BMW कार कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जात होती. हळवल फाट्याजवळ असलेल्या तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने, कारचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावून बसला. या वेगात असलेल्या कारने अचानक उलट्या दिशेने पलटी घेतली. धडकेमुळे कारचा दर्शनी भाग आणि छत पूर्णपणे चुरगळले गेले.

अपघाताच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *