18 Years of Injustice! 12 Accused Acquitted in 2006 Mumbai Bomb Blast Case — Who Are the Real Culprits?

मुंबई | प्रतिनिधी
२००६ साली मुंबईत लोकलमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांत सुमारे १८० ते २०० निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. या प्रकरणात १२ जणांना आरोपी ठरवत अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कठोर आरोप ठेवून १८ वर्षे तुरुंगात काढायला लावले.

परंतु मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निकाल खळबळजनक आहे. न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, या १२ आरोपींविरुद्ध ठोस साक्षी, पुरावे, वैज्ञानिक कसोट्या यांचा अभाव आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं आहे.

➡️ म्हणजे १८ वर्षे त्यांनी तुरुंगात कायद्याच्या चुकीच्या व्याख्येमुळे घालवली?
➡️ मग या हल्ल्याचे खरे आरोपी कोण?
➡️ त्यांचा शोध कोणी लावायचा?
➡️ या चुकीच्या तपासासाठी जबाबदार असलेले अधिकारी कोण? आणि त्यांच्यावर कारवाई होणार का?
➡️ या १२ निर्दोषांची १८ वर्षांची भरपाई कोण देणार? मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान याचे काय?

⛔ या सगळ्या प्रश्नांनी व्यवस्था आणि न्याय यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा केलं आहे.

🔍 हेच न्याय फलघाम हल्ल्यात सुद्धा होत आहे. त्या प्रकरणातील खरे गुन्हेगार अजून सापडले नाहीत. मग, भारतीय तपास यंत्रणा आणि साक्षी-पुराव्यांचे व्यवस्थापन हे कितपत विश्वासार्ह आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *