देशाच्या विविध भागात मान्सूनच्या हजेरीने नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. काही भागातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे देशाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आहे. सध्या, सोशल मीडियावर हरिद्वार येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नदीत वाहून जाणाऱ्या एका इसमाला एनडीआरएफच्या जवानांनी मोठ्या शौर्याने वाचविले. त्यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या जवानांच्या कार्याला सलाम केला.