Pressnote_New (1)Final All Wards 2

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५२२ हरकती प्राप्त; आठ प्रभागांच्या हद्दीत बदल

बातमी:
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात एकूण १५२२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १३२३ हरकती पूर्णतः मान्य, तर ६९ अंशतः मान्य करण्यात आल्या असून ४५४ हरकती अमान्य ठरल्या आहेत.

यासोबतच ८ प्रभागांच्या सीमामध्ये बदल करण्यात आले असून संबंधित भागांची नावेही सुधारण्यात आली आहेत. यामध्ये कळस–धनोरी, कात्रज– घोरपडी , मांजरी बुद्रुक–साडेसतरानळी, रामटेकडी– माळ वाडी, शिवदर्शन–महेश सोसायटी, कस्तुरबा रस्ता–नेहरू हॉस्पिटल, घोरपडी पेठ –गुरुवार पेठ, आणि बालाजीनगर–कात्रज या प्रभागांचा समावेश आहे.

आयोगाच्या अंतिम प्रभाग रचनेची मान्यता दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी देण्यात आली असून, या निर्णयानंतर निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *